मुंबई | देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखली जाणारी मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. याप्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. काँग्रेसचा हा उमेदवार दुसरा तिसरा कोणी नसून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा देण्यात आला आहे. देवरा यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
‘मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठीचे योग्य उमेदवार आहेत. त्यांनी दक्षिण मुंबईचे १० वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. मिलिंद यांना सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेचे सखोल ज्ञान आहे.’ त्यामुळे त्यांना निवडूण द्या, असे अंबानी यांनी दक्षिण मुंबईतील जनतेला देवरा यांना मत देण्याच आव्हान व्हीडिओतून केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून देवरा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. देवरा यांना भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यात दुहेरी लढत पाहायला मिळाली आहे.
From small shopkeepers to large industrialists – for everyone, South Mumbai means business.
We need to bring businesses back to Mumbai and make job creation for our youth a top priority.#MumbaiKaConnection pic.twitter.com/d4xJnvhyKr
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) April 17, 2019
दक्षिण मुंबई म्हणजे व्यापार, त्यामुळेच अगदी लहानात लहान दुकानदारापासून ते मोठ्या इंडस्ट्रीयलीस्टपर्यंत इथे व्यापार आहे. येथील सर्वच व्यापाऱ्यांना समृद्ध करायचे असून येथे मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध करायचा असल्याचे मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमधील व्हीडिओत छोट्या दुकानदारांपासून ते अंबानींपर्यंत सर्वांच्याच प्रतिक्रिया असून त्यांनी देवरांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, दक्षिण मुंबई मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यादिवशी राज्यातील एकूण १७ मतदारसंघात मतदान होत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.