HW News Marathi
राजकारण

संभाजी भिडेंनी महिलांसंदर्भात केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

मुंबई। संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीसंदर्भात महिला पत्रकारांनी भिडेंना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “कुंकू  तरच तुझ्याशी बोलतो”, असे वादग्रस्त विधान केले. याप्रकरणी राज्यभरातून संभाजी भिडे यांच्यावर टीका होत आहे.  कार्तिकी पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृत फडणवीस (Amruta Fadnavis) हे दोघेही पंढरपूरमध्ये आले आहेत. यावेळी अमृता फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावर माध्यमांशी बोलताना प्रक्रिया दिली आहे.
अमृता फडणवीस म्हणाले, “भिडे गुरुजी हे हिंदुत्वाचे स्तंभ आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे. परंतु, महिलांनी कसे जगावे हे ते सांगू शकत नाहीत. महिलांचे एक जीवनशैली असते. प्रत्येक महिलेला तिच्या पद्धतीने  जगते तिचा आदर करावा.”
पुढे अमृता फडणवीस म्हणाले, “पंढरीमध्ये आम्ही आलो, वारकऱ्यांसह फुगडी खेळली. त्यांच्याबरोबर ताल धरला यात खूप आनंद मिळाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मध्यरात्री शिव विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा आमच्या हस्ते होणार आहे. यावेळी शेतकऱ्यांचे जीवन सुखद होवो. शेतकऱ्यांच्या सर्व गरजा पूर्ण होवो. शेतकऱ्यांच्या शेतीविषयक सर्व समस्या कमी व्हावा. कर्ज दर कमी होत. अशी मागणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेकडे करणार आहे, ” असे त्यांनी  सांगितले.

Related posts

“अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Aprna

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधील फोन चर्चेसंदर्भात शिवसेनेने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Aprna

आता सुज्ञ जनता राष्ट्रवादीसारख्या बुडत्या पक्षाला आधार देणार नाही !

News Desk