HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

स्टार प्रचारकांच्या यादीतून मुलायम सिंह यांना डच्चू, अखिलेश आजमगडमधून निवडणूक लढविणार

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने आज (२४ मार्च) स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीत मुलायम सिंह यादव यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव रामपूर मतदार संघातून निवडणूक लढविणार आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव  उत्तर प्रदेशमधील आजमगड मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.

यापूर्वीच्‍या लोकसभा निवडणुकीत आजमगड या जागेवरुन अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंह यादव यांनी विजय मिळवला होता. तर ज्‍येष्‍ठ नेते व माजी मंत्री आजम खान रामपूरमधून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. आजमगड हा समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदार संघात कायम वर्चस्व राहिले आहे. ७० च्या दशकातपर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते. यानंतर या मतदार संघात सपाने आपले वर्चस्व मिळाले आहे.

समाजवादी पक्षाच्या स्टार प्रचारकांची नावे

  • अखिलेश यादव
  • डिंपल यादव
  • जया बच्चन
  • राम गोपाल यादव
  • राजेंद्र चौधरी
  • आजम खान

Related posts

Chhattisgarh Assembly Elections 2018 : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

News Desk

उत्तर भारतीयाला मारहाण केल्याप्रकरणी ३ शिवसैनिकांना अटक

Gauri Tilekar

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मोठी बाचाबाची

Gauri Tilekar