HW News Marathi
राजकारण

भाजप म्हणजे खडसेंसाठी जीना यहाँ, मरना यहाँ

नाशिक | भाजप म्हणजे खडसेंसाठी जीना यहाँ, मरना यहाँ असे आहे. पक्ष वाढविण्यासाठी एकनाथ खडसेंनी खूप कष्ट घेतले आहेत त्यामुळे ते भारतीय जनता पक्ष कधीच सोडणार नाहीत, असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

गुरुवारी वृक्षलागवडीचा आढावा घेण्यासाठी मुनगंटीवार नाशिकमध्ये दाखल झाले होते. दुपारी त्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला असता एकनाथ खडसे यांच्या नाराजी संदर्भात मुनगंटीवार यांना विचारले असता मी त्यांच्याशी संपर्क साधणार आहे, जर देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहेत तर खडसे यांच्यावर अन्याय कसा? एकनाथ खडसे यांच्यासाठी भाजप म्हणजे ‘जीना यहां मरना यहाँ इसके सिवा जाना कहा’ असे आहे, असे मुनगंटीवार म्हणालेत. त्यानंतर त्यांनी भुजबळ यांनी माझा कट्टयावर केलेल्या बाळासाहेबांच्या अटकेच्या फाईलवरील सहीच्या वक्तव्याचाही खरपूस सामाचार घेतला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा

Aprna

#MarathaReservation : विधेयक न्यायालयात टिकवण्यासाठी वकिलांची फौज उभी करू !

News Desk

आमच्यात आता मतभेद नाहीत, एकत्र येऊन रॅली काढावी ठाकरेंचे विरोधकांनी आव्हान

News Desk
देश / विदेश

बजरंग दल, विहिंप भारतातील धार्मिक दहशवादी संघटना

News Desk

नवी दिल्ली | अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने जगभरातील देशांमधील राजकीय दबाव गट आणि त्यांच्या प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. तसेच या यादीमध्ये भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दल या दोन्ही संघटनांना धार्मिक दहशवादी संघटनांच्या यादीत समावेश केला आहे. या दोन्ही संघटना धार्मिक दहशतवादी संघटना (Militant Religious Organization) असल्याचे सीआयएने घोषित केली आहे.

त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रवादी संघटना (Nationalist Organization) असे देखील म्हटले आहे. यामध्ये विविध देशांचा इतिहास, भूगोल, सरकार, अर्थव्यवस्था, ऊर्जा, दूरसंचार, परिवहन, लष्कर, आंतरराष्ट्रीय मुद्दे आणि राजकीय पक्षांबाबतच्या माहितीचा यात समावेश आहे.

तसेच ठराविक विचारसरणीचा अवलंब करणाऱ्या संघटनांना कट्टरतावादी किंवा दहशतवादी संबोधल्यामुळे बजरंग दल आणि विहिंपने दहशतवादी शिक्का हटवा नाही. तर आम्ही कायदेशीर कारवाई करु, असा इशारा या दोन्ही संघटनांनी सीआयएला दिला आहे.

सीआयएने जाहीर केलेल्या यादी भारतातील अजून ७ संघटनांचा समावेश आहे. सीआयएने त्यांना विविध श्रेणीमध्ये ठेवले आहे. यात जम्मू काश्मीरमधील ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सला फुटीरतावादी गटात, तर जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनेचा बजरंग दल आणि विहिंपप्रमाणे कट्टरतावादी संघटनेच्या गटात समावेश केला आहे.

 

Related posts

त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद; मालेगावत रॅलीला हिंसक वळण

News Desk

आंदोलनावेळी शतकऱ्यांचे झालेले मृत्यू नसून त्या हत्याच – संजय राऊत

News Desk

दिल्लीत पुन्हा विद्यार्थी हत्याकांड

News Desk