HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे !

मुंबई । “पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस बँकेकडे वर्ग करताना मुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे”, असा अत्यंत गंभीर आरोप करत “मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे”, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रचारसमितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस बँकेत वर्ग केल्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना २००५ सालीच पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा मुख्यमंत्र्यांनी नुकताच एका मुलाखतीत केला आहे. मात्र त्यांचा हा दावा खोटा आहे”, असे नाना पटोले म्हणाले. “विलासराव देशमुख यांच्या काळात पोलिसांची पगार खाती वर्ग करण्यासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयामध्ये वेगवेगळ्या १५ बँकांची नावे होती. त्या शासन निर्णयात ही खाती एकट्या अ‍ॅक्सिस बँकेत वर्ग करावीत असे म्हटले नव्हते”, असे नाना पटोले यांनी सांगितले.

“2017 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस मुख्यालयातून एक परिपत्रक काढण्यात आले. पोलीसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेतून करण्याचा निर्णय झाला. याविरोधात मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातील गडबड लक्षात आल्याने न्यायालयाने या याचिकेचे जनतहित याचिकेमध्ये रूपांतर करून घेतले आहे. याचाच अर्थ न्यायालयाला याचे गांभीर्य समजले आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे”, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

म्हणूनच अमृता फडणवीस यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी बढती झाली का ?

“मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अ‍ॅक्सिस बँकेत नोकरीला आहेत. गेल्या ५ वर्षात मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून अ‍ॅक्सिस बँकेला मदत केली म्हणूनच अमृता फडणवीस यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी बढती झाली का ?” असा सवाल देखील नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्या.” – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Chetan Kirdat

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवालया हवे होते !

News Desk

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; भाजप आणि मविआ कोणाच होणार विजय

Aprna