HW News Marathi
राजकारण

शिवसेना हा नितिमत्ता संपलेला पक्ष, नारायण राणेंची घणाघाती टीका

मुंबई | “शिवसेना हा नितिमत्ता संपलेला पक्ष आहे. त्यांच्या नेत्यांनी युती करून त्यांचीच फजिती करून घेतली आहे. भाजपने सांगितले असेल की आता आम्ही तुम्हाला सडवणार नाही. त्याचमुळे जनतेच्या भल्यासाठी नाही तर मातोश्रीच्या भल्यासाठीच ही युती झाली आहे. आता आगामी निवडणुकीत शिवसेना फक्त १० जागा जिंकेल”, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केली आहे.

“भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांना युतीचा फायदा होणार नाही. ही युती जनतेच्या भल्यासाठी नसून ती मातोश्रीच्या फायद्यासाठी आहे. शिवसेनेने भाजपबाबत केलेली विधाने, टीका आणि त्यांचे वागणे भाजपचे कार्यकर्ते कधीही विसरणार नाहीत. ते एकत्र आले तरीही मने जुळणार नाहीत. कालच्या संपूर्ण कार्यक्रमात कुठेही उत्साह दिसला नाही. इतकेच नव्हे तर युतीच्या निर्णयानंतर त्यांनी एकमेकांचे अभिनंदन देखील केले नाही. जशी युती झाली तसे कार्यकर्ते घरी गेले”, असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सातरच्या गादीसमोर काँग्रेसचे “पृथ्वीअस्त्र” भयभीत होऊन पळाले !

News Desk

शिवसेनेच्या ५६ विजयी आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक

News Desk

मोदीजी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, हो किंवा नाही ?

News Desk