HW News Marathi
राजकारण

पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारात असणार राणेंचा सहभाग

ठाणे | दिवंगत खासदार चितामण वनगा यांच्या निधनानंतर पालघर पोटनिवडणुकीत चिंतामण वनगा यांच्या मुलाला उमेदवारी देऊन कुरघोडी करणाऱ्या शिवसेनेवर मात करण्यासाठी भाजपाने नवी खेळी खेळल्याचे पहायला मिळत आहे. या निवडणुकीत सेना भाजप आमने-सामने ठाकल्यामुळे निवडणुकीची रंगत आणखीनच वाढली आहे. शिवसेनेकडून बुधवार १६ मे रोजी युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे प्रचारासाठी पालघर मध्ये वनगांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. वनगा कुटुंब नाराज होऊन शिवसेनेत गेल्यानंतर भाजपने ऐनवेळी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना गळाला लावत त्यांना उमेदवारी दिली आहे. गावित यांच्या प्रचारासाठी भाजपकडून नारायण राणे पालघरमध्ये उपस्थित राहणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली पहायला मिळत आहे.

नारायण राणे यांचे शिवसेनेशी असलेले संबंध पहाता राणे प्रचारासाठी मैदानात उतरले तर दोन्ही पक्षांच्या एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पहायला मिळतील. भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. वनगा यांच्या कुटुंबाने गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने भाजपासमोरील अडचणी वाढल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरव मोदी, ललित मोदी आणि अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी !

News Desk

उपेंद्र कुशवाह यांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

News Desk

शेतकऱ्याच्या घटलेल्या उत्पन्नाची सत्ताधाऱ्यांना जाणीव आहे का? 

News Desk