HW News Marathi
राजकारण

नीरव मोदी, ललित मोदी आणि अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी !

जयपूर | “इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने तीन मोदी दिले आहेत, नीरव मोदी, ललित मोदी आणि अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी,” अशा शब्दात पंजाब सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे. राजस्थान मधील प्रचारसभेदरम्यान नवज्योतसिंग सिद्धू यांनी परदेशात पळ काढणारे कर्जबुडवे उद्योगपती नीरव मोदी आणि ललित मोदीवरुन भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. नवज्योतसिंग सिद्धूंच्या या टीकेला भाजपा काय प्रत्युत्तर देणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठीच्या २०० जागांसाठी ७ डिसेंबरला मतदान होणार आहे. सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही नेता संधी सोडताना दिसत नाहीयेत. तर दुसरीकडे, करतारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावण्यासाठी सिद्धू पाकिस्तानला गेल्याने निर्माण झालेला वाद ताजा असतानाच त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पाकिस्तानला पाठविलेले नव्हते, असे नवे स्पष्टीकरण नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी(१ डिसेंबर) दिले आणि आधीच्या आपल्या वक्तव्यावरून त्यांनी घूमजाव केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा !

News Desk

Breaking News | रोहित पवार-रविकांत तुपकरांची बंद दाराआड चर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना ३ जागांवर ठाम

News Desk

भाजपने मित्रपक्षांना जागा ‘दाखवली’ म्हणजे ‘दिली’, उद्धव ठाकरेंचा टोला

News Desk