HW News Marathi
राजकारण

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या नव्या तारखेची चर्चा

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी (२ ऑक्टोबर) नारायण राणे हे आपले दोन्ही पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये बुधवारी संध्याकाळी ४ वाजता राणेंचा भाजप प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या तसेच पक्ष विलीनीकरणाच्या अनेक तारखा आतापर्यंत समोर आल्या आहेत. मात्र, काही राजकीय कारणास्तव हा पक्षप्रवेश वारंवार पुढे ढकलला गेला आहे.

१ सप्टेंबरला नारायण राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याचे वृत्त पुढे येत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यात येणार होता. मात्र, तसे झाले नाही. नारायण राणे गेल्या ४ दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. कोकणातील प्रभावशाली नेते अशी त्यांची ओळख आहे. मात्र, नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेकडून तीव्र विरोध आहे. याचमुळे राणेंच्या भाजप प्रवेशामध्ये वारंवार अडचणी येत असल्याची चर्चा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या भेटीपासून तृप्ती देसाईंना रोखले

News Desk

रिपब्लिकन पक्षाला मिळणारे राज्यातील एक मंत्रिपद अविनाश महातेकर आणि भुपेश थुलकर यांना विभागून देणार

News Desk

पायलटसह ज्योतिरादित्य यांचे माल्ल्याने केले अभिनंदन

News Desk