नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज (१९ जून) ४९ वा वाढदिवस आहे. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. खरंतर, राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी हे एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी मानले जातात. यंदाच्या लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळाली. दोघांकडूनही एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप, टीका देखील केल्या गेल्या. प्रचारादरम्यान वैयक्तिक टीका देखील झाल्या. मात्र, यंदाच्या लोकसभेत राहुल गांधी यांना अत्यंत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले तर पंतप्रधान मोदींना ऐतिहासिक विजय मिळाला.
Best wishes to Shri @RahulGandhi on his birthday. May he be blessed with good health and a long life.
— Narendra Modi (@narendramodi) June 19, 2019
लोकसभेतील हा पराभव राहुल गांधी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत ठेवला होता. मात्र, राहुल गांधी यांचा राजीनामान्याचा हा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या सदस्यांकडून एकमताने फेटाळण्यात आला. त्यानंतरही राहुल गांधी हे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती मिळत होती. लोकसभेच्या निकालानंतर राहुल गांधी हे कटाक्षाने माध्यमांपासून दूर राहिल्याचे देखील चित्र आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.