HW News Marathi
राजकारण

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार ?

मुंबई | पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे पाटील यांना ग्राहक संरक्षण राज्यमंत्रीपद देण्यात आल्याने आता भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची निवड होणार ?, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, डॉ. संजय कुटे या नावांची चर्चा सुरु आहे.

भाजप यंदाची विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढविणार आहे. भाजप सध्या पक्षसंघटनेची ताकद वाढवू शकेल आणि मुख्यमंत्र्यांशी समन्वय ठेऊन काम करू शकेल अशा व्यक्तीच्या शोधात असल्याचे म्हटले जात आहे. विधानसभा निवडणूका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीची रणनीती डोळ्यांपुढे ठेवत भाजपला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी लवकरात लवकर एका व्यक्तीची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींवर मानहानीचा दावा

Gauri Tilekar

शिवराज सिंग यांचा राजीनामा, काँग्रेसला सत्तेसाठी मायावतीसह अखिलेशची सात

News Desk

महाआघाडीचा तिढा अखेर सुटला, काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागांवर निवडणुका लढविणार

News Desk