HW News Marathi
राजकारण

नरेंद्र मोदी ३० मे रोजी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा देशातील जनतेने पंतप्रधान मोदींच्या बाजूने कौल देऊन त्यांना ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. त्यानंतर एनडीएची सरकार स्थापनेसाठी हालचाल सुरु झाली. दिल्लीत शनिवारी (२५ मे) एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाला समर्थन दिले. नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी म्हणजेच ३० रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील, अशी माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता मोदींचा शपथविधी सोहळा पार पडेल.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील, अशी माहिती मिळत आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना देखील यावेळी शपथ दिली जाईल. दरम्यान, मोदींच्या मंत्रिमंडळातील या सदस्यांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. भाजप यंदा आपल्या मित्रपक्षांना किती मंत्रिपदे दिली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

मोदी सरकारच्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या ५ ते १५ जून दरम्यान या सरकारचे पहिले अधिवेशन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर जुलै महिन्यात हे मोदी सरकार आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट, राष्ट्रपतींनी दिली मंजुरी

News Desk

#LokSabhaElections2019 : शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

News Desk

“शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात निष्ठावंतांना स्थान नाही”, आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

Aprna