HW News Marathi
राजकारण

उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर डिबेटला यावे; आदित्य ठाकरेंचे ओपन चॅलेंज

मुंबई। शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महाराष्ट्रातून बाहेर जात असलेल्या उद्योगांबाबत सोमवारी पत्रकार परिषद घेत पुराव्यांसह शिंदे-फडणवीस सरकारचे वाभाडे काढले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
 यांनी सोमवारी उद्योग विभागाबाबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवर आदित्य ठाकरे यांनी पुराव्यांसह सडेतोड उत्तर दिले. खरे तर उत्तर मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर देणे अपेक्षित होते. स्क्रिप्ट वाचून दाखवली तरी चालेल, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसेच पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिले. उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर डिबेटला यावे, असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.
आदित्य ठाकरे म्हणाले, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने दोन हजार कोटींचा इलेक्ट्रॉनिक हब उद्योग उभारला आहे.वेदांत, फॉक्सकॉन प्रकल्पापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण दीड लाख कोटींपेक्षा मोठा प्रकल्प दोन हजार कोटींचा असतो हे मला माहीत नाही,” असा उपहासात्मक टोला लगावला.
आदित्य ठाकरे यांनी पुढे फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेचा खोटा बुरखा पुराव्यासह फाडला. उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करू नका, फॉक्सकॉनचा पहिला प्रकल्प वेगळा होता, महाराष्ट्रात खोटे बोलण्याचा प्रयत्न होत आहे, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
टाटा एअर बस प्रकल्पात सरकारचे म्हणणे आहे की, टाटाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील वातावरण चांगले नव्हते, त्यामुळे गुंतवणूक निघाली. तर फडणवीस यांनी त्या अधिकाऱ्याचे नाव सांगा. केवळ उद्योगमंत्र्यांशीच नव्हे, तर नितीन गडकरीजींनीही या प्रकरणी पत्रव्यवहार केला आहे, सरकारनेही पत्रव्यवहार केला आहे. राज्य सरकार आपल्या उणिवा झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे हात दाखवत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांचा अपमान केला. याशिवाय, नोकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेम्बडी पोरे म्हटले, हे अत्यंत चुकीचे आहे. उपमुख्यमंत्री यांनी शब्द मागे घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
वेदांता फॉक्सकॉन टाईमलाईन
वेदांता फाॅक्सकाॅन ५ जानेवारी २०२२
वेदांताने केंद्र सरकारने अप्रुव्हल दिले.
१९ जानेवारी रोजी देसाई साहेबांचे पत्र अग्रवाल यांना.
फेब्रुवारी २४ रोजी साईट विसिट तळेगावला.
३ मे फाॅक्सकाॅनची तळेगाव साईट विसिट
६ मे मी, देसाई साहेब आणि वेदांताची बैठक
२४ मे दावोसला अनिल अग्रवाल साहेबांची भेट
आम्ही महाराष्ट्रात येण्याची विनंती केली.
२४ जून फाॅक्सकाॅनच्या लोकांची आमची दिल्लीत भेट
सरकार पडले.
शिंदेंनी फाॅक्सकाॅनला पत्र लिहिले.
१० हजार पेक्षा अधिक सबसिडी मविआने दिली गुजरात पेक्षा अधिक.
मग २०२१ सालीच ते जाणार होते तर २०२२ साली ज्या बैठका झाल्या त्याचे काय?

Related posts

…त्या दिवशी पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल !

Gauri Tilekar

सभागृहातील आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर

Aprna

प्रांतीय अस्मितेचे जनक बाळासाहेब ठाकरेच !

News Desk