HW News Marathi
राजकारण

#PulwamaAttack : हे ५६ इंच छाती असणाऱ्या पंतप्रधानांचे अपयश !

बारामती | जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा असल्याचे पवारांनी म्हणाले आहे. सध्याची परिस्थिती पाहता ही राजकारण करण्याची योग्य वेळ नसल्याच म्हणत, देशाचे संरक्षण करण्यात ५६ इंचाची छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपयश असेही पवारांनी म्हटले आहे. पवरांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले आहे.

भारतीय लष्कराच्या जवानांवर झालेला हल्ला ही देशासाठी चिंतेची बाब असून ज्या मार्गावर हा दहशतवादी हल्ला झाला तो संपूर्ण परिसर तुलनात्मकरित्या सुरक्षित आहे. मात्र या मार्गावरुन सीआरपीएफच्या जवानांचा ताफा जाणार आहे. सुरुवातीला हल्ला झाला आणि नंतर गोळीबारही करण्यात आला याचा अर्थ काही दहशतवादी लपून बसले होते. ज्याप्रकारे खबरदारी घ्यायला हवी होती ती खबरदारी घेतली गेली नसावी अशी शंका यानिमित्ताने समोर येत असल्याचेही शरद पवार म्हणाले.

पुलवामामधील झालेला हल्ला हा देशावरील हल्ला आहे. त्यामुळे यावर राजकारण करण्याची ही वेळ नाही. परंतु सध्या सत्तेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर नसताना काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवरून टीका केली होती. त्यावेळी मोदी म्हटले की, दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ५६ इंच छाती हवी, अशा शब्दात नरेंद्र मोदींनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती, याची आठवण शरद पवार यांनी करुन नरेंद्र मोदींना टोला हाणला आहे. सध्याची स्थिती बिकट असली तरी अशा परिस्थितीत शहीद आणि जखमी जवानांच्या कुटुंबियांच्या मागे संपूर्ण देश उभे राहण्याची गरज असल्याची भावना शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्या आम्ही अधिकृत कॅबिनेट करून नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार! – मुख्यमंत्री

Aprna

#RafaleDeal : संसदेत ‘कॅग’चा अहवाल सादर, विरोधकांची जोरदार प्रदर्शने

News Desk

Shivsena Dasara Melava 2018 | सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता !

News Desk