HW Marathi
राजकारण

नवनीत राणा-भाजपमधील संघर्ष चिघळणार ?

मुंबई | अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा आणि भाजपमधील वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (१७ जून) नवनीत कौर राणा यांनी भाजप खासदारांनी दिलेल्या “जय श्री राम”च्या घोषणांवर आक्षेप घेतला होता. याच पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. नवनीत कौर राणा यांनी लोकसभेत “जय श्रीराम”च्या घोषणांवर आक्षेप घेतल्याने आता भाजपकडून राणा यांना “जय श्री राम” लिहिलेली तब्बल ५०० पोस्टकार्डस पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

“संसद ही ‘जय श्रीराम’चे नारे देण्यासाठी योग्य जागा नाही. त्यासाठी मंदिरे आहेत. सर्व देव एकच आहेत, यावर माझा विश्वास आहे. संसदेत ‘जय श्रीराम’चे नारे देणे अयोग्य आहे. संसदेत आम्ही सदस्यत्त्वाची शपथ घेत असताना काही जण मात्र मोठमोठ्याने ‘जय श्रीराम’चे नारे देत होते. हे योग्य नाही”, अशी भूमिका नवनीत कौर राणा यांनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपने राजा यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.

Related posts

जवानांचा जय व किसानांचा पराजय असे होऊ नये !

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे कार्यकर्त्यांना आवाहन- समाजात फुट पडू देऊ नका

News Desk

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर

News Desk