HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मोदी तुमच्या पापाचा घडा भरला आहे | नवाब मलिक

मुंबई | “तुरुंगात टाकण्याचा खेळ तुम्ही सुरू केला आहे. त्यामुळे तुमच्या पापाचा घडा भरला आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. गोंदिया येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी ही टीका केली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. म्हणजे आता पंतप्रधान मोदींना देशात भाजपचा पराभव होणार हे दिसू लागले आहे”, असा टोलाही नवाब मलिक यांनी यावेळी लगावला आहे. “मोदी विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहेत. त्यांच्या या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरणार नाही”, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

Related posts

अखेर शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश

News Desk

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावर मीम्सचा पाऊस 

News Desk

पालघरची स्वाभिमानी जनता कॉंग्रेसच्या उमेदवाराला विजयी करेल

News Desk