HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

जर ५६ इंचाची छाती आहे तर कुलभूषण जाधवला सोडून का आणत नाही ?

सातारा |  “तुमची छाती जर ५६ इंचाची छाती आहे तर कुलभूषण जाधवला सोडून का आणत नाही,” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला हाणला. पवार पुढे असे देखील म्हणाले की, राफेल प्रकरणात चौकशीला का घाबरता? या देशाच्या संरक्षण दलांबाबत आपल्या सगळ्यांना अभिमान यशवंतराव चव्हाण यांनी देश मजबूत केला. पवार यांनी महाआघाडीच्या प्रचाराचा नारळ सातारा जिल्ह्यातील कराडमधून आजपासून (२४ मार्च) केला आहे.

सैनिक सर्व त्याग करायला तयार आहेत. पण आताचे सरकार सैनिकांच्या पराक्रमाचा राजकीय फायद्यासाठी वापर करतय हवाई दलाचा आम्हाला अभिमान आहे अभिनंदनला अटक केल्यानंतर जगातील देशांनी पाकिस्तानवर दबाव टाकला आणि अभिनंदनची सुटका झाली. त्यावेळी भारताचे एक हेलिकॉप्टर पाकिस्तानने पाडले, त्यामध्ये  नाशिकचे जवान मांडवगणे शहिद झाले. त्यांच्या पत्नीनी म्हणाली की, शहिदांच्या पराक्रमाचे राजकारण करु नका.

पाकिस्तानला गुपचूप शुभेच्छा का देता सैनिकांच्या पराक्रमाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून दिली पाहिजेल. यासभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, आदी नेते मंडळी उपस्थित आहेत.

कोल्हापुरात युती आणि कराडात महाआघाडीची एका दिवशी दोन्ही सभा घेण्यात आल्या होत्या. तसेच माझे व्यक्तीमत्व लोकांपर्यंत पोहोचवले ते यशवंतराव चव्हाण आहेत. त्यामुळे कृष्णा-कोयनेच्या प्रितीसंगमावर सभा घ्यायचे ठरवले. आमच्या काळात ही यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यावेळी मी त्यावेळचे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना जाऊन भेटलो आणि आम्ही यवतमाळला जायचे ठरवले. दुसऱ्याच दिवशी आमचे सरकार त्या शेतकऱ्याच्या घरी पोहोचलो. त्यावेळी कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या बदनामीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समजले. त्यानंतर आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला यांची देखील पवारांनी आठवण करून दिली.

 

Related posts

‘मराठा’ विद्यार्थ्यांना न्याय मिळायलाच पाहिजे !

News Desk

राम कदम यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा घरचा आहेर…

News Desk

“मोदी स्वतंत्र भारताला मिळालेले सर्वात वाईट पंतप्रधान”

News Desk