HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

दुसरा मोदी तयार होऊ नये म्हणून मी माझे बोट आता कोणाला धरु देत नाही !

दौंड | “मी माझे बोट आता कोणाला धरु देत नाही. दुसरा कोणी मोदी तयार होऊ नये म्हणून मी ही काळजी घेतोय,” अशा खोचक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली. शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात प्रमुख कार्यकर्त्यांना यवत येथे मार्गदर्शन करताना पवार बोलताना म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, माझे बोट धरून राजकारणात येणार्‍या मोदींनी वर्ध्याच्या सभेत माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका केली. पवार कुटुंबात भांडणे आहेत, असे ते म्हणाले. राजकारणात वैयक्‍तिक टीका करू नये, हा अलिखित नियम आहे. मला दिल्लीत मोदी भेटल्यावर त्यांना मी विचारीन की, माझ्या घरात भांडणे आहेत, हे तुम्हाला कसे कळले. माझे घर भरलेले आहे. तुमचे घर कसे आहे.

मोदी सरकार २०१४च्या निवडणुकीत विकासाच्या मुदद्यावरून सत्तेत आली. आता मोदी सरकार विकासाच्या मुद्द्या सोडून हिंदूत्वाचा मुद्द्यावरून राजकारण करत आहे. तसेच ‘मोदी आमच्या आघाडीला मिलावट आहे, असे म्हणत मोदी म्हणाले. आम्ही काही पक्ष एकत्र आलो ही गोष्ट खरी आहे. देशभरात आम्ही सगळे मिळून २६ पक्ष आहोत. पण भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे एकूण ३६ पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे मोदी जर आम्हाला मिलावट म्हणत असतील तर ते महामिलावट आहेत’, अशी बोचरी टीका यावेळी शरद पवार यांनी केली.

 

 

Related posts

राफेल प्रकरणी मोदींना क्लिन चिट देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

News Desk

विकास करता आला नाही म्हणून भाजपने राम मंदिराचा मुद्दा उकरून काढला !

News Desk

संभाजी भिडे यांना जामीन मंजूर

News Desk