HW Marathi
राजकारण

राष्ट्रवादीची मनसेला साथ नाही

मुंबई | आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगत होत्या. मात्र आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही प्रश्नावर आमच्यासोबत असले तरीही आम्ही निवडणुकीत एकत्र नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात ४८ पैकी ४४ जागांचे वाटप पूर्ण झाल्याचे देखील शरद पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित-बहुजन आघाडीशी देखील आपली चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मनसेचा देखील या आघाडीत समावेश  असणार असून मनसेने मुंबई-नाशिकमधील जागांची मागणी केल्याची चर्चा रंगत होती. मात्र, मनसेचा आघाडीत समावेश असणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

 

Related posts

महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न | आव्हाड

News Desk

राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची नियुक्ती

News Desk

दोनदा मतदान करण्याचा सल्ला, भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना भोवला

News Desk