HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

कावीळ झालेल्याला जग पिवळं दिसतं, तशीच राम कदमांची अवस्था !

मुंबई | “तब्बल ८२ वर्षांनंतर हे असे पाहिले अधिवेशन असेल कि ज्या अधिवेशनात दुर्दैवाने कोणत्याही आमदाराला प्रश्न विचारता येणार नाहीत. हा या विकासविरोधी सरकारचा नाकर्तेपणा आहे”, असे म्हणत भाजप आमदार राम कदम यांनी राज्यातील महाविकासाआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. “विकासविरोधी सरकारच्या कामाची अजब पद्धत.. हिवाळी अधिवेशनात आमदाराना प्रश्न विचारण्यावर प्रतिबंध. प्रश्नोत्तराचा तास होणार नाही. सरकारने आमदारांना प्रश्न दाखल करण्यापासून रोखले..”, असे लिहीत राम कदम यांनी आपला एक व्हिडीओ यासोबत ट्विट केला आहे. दरम्यान, राम कदम यांच्या या ट्विटला आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

“आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्ये करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित करायचे प्रश्न (LAQ) तीस दिवस आधी देणे अपेक्षित असते, सदनात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात”, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे, “कामकाज सल्लागार समितीच्या (BAC) अजेंड्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याला आपल्या पक्षाचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली आहे. कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था राम कदम यांची झालेली दिसते”, असा टोलाही यावेळी मलिक यांनी राम कदम यांना लगावला.

राम कदम आपल्या व्हिडिओत काय म्हणाले ?

“जर यांनी वेळीच खातेवाटप केले असते तर आम्हा सर्व आमदारांना प्रश्न विचारता आले असते. जर आम्हाला प्रश्नच विचारता येणार नसतील तर त्या अधिवेशनाला अर्थ काय ? या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. हा आम्हा सर्व आमदारांना आमच्या अधिकारांचा वापर करता येणार नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे”, असे राम कदम यांनी आपल्या या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

Related posts

मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट होणार?

rasika shinde

शेतकऱ्यांच्या छातीवर गोळ्या झाडणं गैरच- रावसाहेब दानवे

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे खोटे बोलतात !

News Desk