HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन

मुंबई | माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांना प्रकृती अत्यंत नाजूक असल्यामुळे मुंबईतल्या सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या २ वर्षांपासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. डोळस यांच्यावर उद्या (१ मे) सकाळी १० वाजता दसूर तालुका माळशिरस येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून २०१४ मध्ये आमदार डोळस हे २००९ आणि २०१४ मध्ये आमदार झाले होते.

माळशिरस तालुक्यातील दसुर हे डोळस यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कांचन, मुलगा संकल्प, मुलगी सिद्धी, चार बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. १३ ऑक्टोबर २००९ मध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघातून प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. १६२२६ एवढ्या मताधिक्याने ते विजयी झाले होते. माळशिरस मतदारसंघाचे त्यांनी दोनदा प्रतिनिधित्व केले. माळशिरसचे आमदार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारबद्दल दादा भुसेंचे आक्षेपार्ह वक्तव्य; NCPच्या आमदारांचे वेलमध्ये आंदोलन

Aprna

“दसरा मेळावा घ्यायचा अधिकार हा आमचा”, शिंदे गटाचा दावा

Aprna

गुजरातचे पंतप्रधान मोदी, फडणवीस मटका एजंट – राज ठाकरे

News Desk