HW News Marathi
राजकारण

“…त्यांच्या दृष्टींने संभाजी राजे हे स्त्री लंपट आणि व्यसनाधीन”, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट

मुंबई | “स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माधव गोळवलकर यांच्याच्या दृष्टींनी संभाजी राजे हे स्त्री लंपट आणि व्यसनाधीन होते”, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत केला आहे. यासंदर्भात आव्हाडांनी ट्वीट केले असून त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी भाषेतील सावरकर (Freedom Vinayak Savarkar) आणि गोळवळलकर (Madhav Golwalkar) या दोघांच्या पुस्तकातील संभाजी राजेंसदर्भात लिहिलेल्या वक्तव्याचे पाना फोटो काढून आव्हाडांनी ट्वीट केला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “सावरकरांनी व माधव गोळवलकरांनी छत्रपती संभाजी ह्यांच्या बद्दल काय लिहून ठेवले ते वाचा ह्या शूर विरास बदनाम करण्याचे काम एका वर्गाकडून अनेकवेळा झाले सावरकर आणि गोळवळकरांच्या दृष्टींनी संभाजी राजे हे स्त्री लंपट आणि व्यसनाधीन होते कोणी बोलेल ह्याच्या वर”, या ट्वीटमध्ये त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतील सावरकर आणि गोळवळलकर या दोघांच्या पुस्तकातील संभाजी राजेंबद्दल लिहिलेली पानांचे फोटो टाकले आहे.

‘छत्रपती संभाजी महाराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते’, असे विधान हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले होते. अजित पवारांनी संभाजी महाराजांसंदर्भात केलेल्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले असून राज्यभरात अजित पवारांविरोधात आंदोलन सुरू आहे. यात आता आव्हाडांच्या ट्वीटमुळे नवा वाद ओढवून घेतला आहे.

 

 

Related posts

विदर्भाच्या विकासाचा हा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही !

News Desk

#LokSabhaElections2019 : भाजपने उमेदवारी दिली तर माढ्यातून लढणार !

News Desk

फडणवीसांनी विरोधकांची ‘मळमळ’ काढली, नेमकं काय म्हणाले?

News Desk