HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

सावधान ! काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी !

मुंबई | “महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी,” अशा मार्मिक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर भाजपवर टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज (१२ मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सुजय भाजप प्रवेशानंतर “महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी ! -जनहितार्थ जारी,” असे ट्विट आव्हाडांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या जागेसाठी सुजय यांनी चर्चा केल्या होत्या. परंतु या चर्चेमधून सुद्धा काही फळ न मिळाल्यानंतर शेवटी सुजय यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

Related posts

मराठा आरक्षणाबाबत सरकारचं धोरण अस्पष्ट । धनंजय मुंडे

News Desk

ऍट्रोसिटी कायद्याविरुद्ध कितीही आंदोलने केली तरी त्यात बदल होणार नाही !

News Desk

वैयक्तीक डेटा चोरीसाठी सरकारने आधार कार्ड केले सक्तीचे

News Desk