HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“पहाटेच्या शपथविधीमुळे फायदा एकच झाला…”, शरद पवारांचा वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई | “पहाटेच्या शपथविधीमुळे फायदा एकच झाला की, राष्ट्रपती राजवट जी होती ती उठली”, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar) अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. पहाटे शपथविधी घेणार हे शरद पवारांना माहिती होते, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना पहिल्यादां पहाटेच्या शपथविधीवर प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस असे म्हटले होते की, अजित पवार यांचे जे सरकार त्यांची माहिती शरद पवार यांना होती. आणि माजी राज्यपालांनी बऱ्याच मुलाखती दिल्या. त्यात ते म्हणाले की, अजित पवारांचा पहाटे शपथविधीसाठी आग्रह होता. यासंदर्भात अजित पवार यांना बऱ्याच वेळेला विचारले परंतु, ते काही बोलत नाही. अजित पवार खरे काय आहे, ते सांगायला तयार नाहीत. यात नेमके काय घडले, हे तुम्ही तरी स्पष्ट करा असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “नेमके त्यात सरकार बनविण्याचा प्रयत्न झाला. त्याचा फायदा एकच झाला की, राष्ट्रपती राजवट जी होती ती उठली”, असे म्हटल्यानंतर उपस्थिता एकच हशा पिकला. यानंतर शरद पवार पुढे म्हणाले, “आणि ती उठल्यानंतर काय झाले हे तुम्ही पाहिले असेल.”

पहाटेचा शपथविधी तुम्हाला माहिती होते की नव्हते, असा सवाल पुन्हा एकदा शरद पवार यांनी केल्यावर ते म्हणाले, “बोलायचे आवश्यकता काय?, पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली असती का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असेत का? समजनेवाले को इशारा काफी है”,

देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले

अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीसंदर्भात शरद पवार यांच्याशी बोलणी झाली होती. आम्ही शपथ घेणार हे त्यांना माहिती होते.आणि शरद पवार यांच्या संमतीनेच सगळे झाले होते. परंतु, त्यांनी नंतर धोका दिला, असा धक्कादायक खुलासा केला होता. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “जेव्हा राजकारणात विश्वासघात होत असतो आणि तुमच्याकडे पुढे पर्याय उपलब्ध असतो. तेव्हा चेहरा बघत बसायचा नसतो.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#SushantSinghRajput : अखेर रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचली

News Desk

राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पोलीस भरतीसाठी सुरुवातीला शारीरिक चाचणी होणार; गृहविभागाची अधिसूचना जारी

Aprna

ST विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात; सरकारकडून अंतरिम पगार वाढीचा प्रस्ताव

News Desk