HW News Marathi
राजकारण

साताऱ्याच्या श्रीनिवास पाटलांनी घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली | साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज (१८ नोव्हेंबर) आपल्या खासदारकीची शपथ घेतली आहे. लोकसभा अध्यक्षांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना सत्य आणि गोपनियतेची शपथ दिली आहे. नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकांसह सातारा लोकसभेची पोटनिवडणूक पार पडली. या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी प्रस्थापित खासदार उदयनराजे भोसलेंचा दारुण पराभव केला. विधानसभेच्या तोंडावर उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांना उदयनराजेंविरोधात उमेदवारी देण्यात आली. या पोटनिवडणुकीच्या निकालाने उदयनराजेंना मोठा धक्का दिला.

साताऱ्यातील शरद पवारांची भरपावसातील सभा या सातारा पोटनिवडणुकीत निर्णायक ठरली. या पोटनिवडणुकीत खासदार उदयनराजेंच्या दारुण पराभव झाला. साताऱ्यात असलेले उदयनराजेंचे प्रस्थ पाहता त्यांचा हा पराभव अनेक गोष्टींचे आत्मचिंतन करण्यास लावणारा ठरला. दरम्यान, आपल्या पराभवानंतर दुसऱ्या दिवशी उदयनराजेंनी ट्विटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. “रडीचा डाव मी खेळत नाही. आदरणीय पाटीलसाहेब जिंकले हे खरं आहे. पण लोकसेवा काय केली हे लोकांनी पाहिले पाहिजे. यापुढेही मी जनतेसाठी कार्यरत राहणार असून खचणार नाही”, असे ट्विट उदयनराजेंनी केले होते. महाराष्ट्रात शरद पवारांचे जीवलग मित्र अशी श्रीनिवास पाटलांची ओळख आहे. पाटील यापूर्वी २ वेळा खासदार तर सिक्कीमचे राज्यपालही राहिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील जनतेची निराशा करणारे अधिवेशन-धनंजय मुंडे

swarit

रामदेव बाबांना पुन्हा देशाच्या वाढत्या लोकसंख्येची चिंता !

News Desk

बांगलादेशी नामशुद्र दलितांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार !

News Desk