HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस आता गुजरातमधून २६ जागांवर लोकसभा निवडणूक लढविणार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस आता गुजरातमधून देखील लोकसभा निवडणूक लढविणार आहे. राष्ट्रवादी गुजरातमधून २६ जागांवर निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी महाआघाडीची घोषणा केली. परंतु गुजरातमध्ये दोन्ही पक्षामध्ये जागावाटपावर एकमत न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने याठिकाणी लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच काही दिवसांपूर्वीच गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. वाघेला यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने गुजरातमध्ये मजबूत झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुका लढवत असून राज्यामध्ये काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

तसेच दोन्ही पक्षांकडून मित्रपक्षांची प्रत्येकी २ जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बाल्लेकिल्ला असल्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे आव्हान असणार आहे. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपला सगळ्या जागा म्हणजेच २६ जागा मिळाल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मित्रपक्षावर अवलंबून न राहता स्वबळावर उमेदवार निवडून आणणारा !

News Desk

कुणाकडे किती खोके पोहोचले यावरून आता आमदारांमध्ये भांडण; आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटाला टोला

Chetan Kirdat

मराठा समाजाच्या आरक्षणाचा अहवाल आज शासनाकडे होणार सादर

News Desk