नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य तारिक अन्वर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तारिक अन्वर हे शरद पवार यांच्या भूमिकेवर काहीसे नाराज होते. यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत तारिक अन्वर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Delhi: Former NCP leader Tariq Anwar joined Congress in presence of party president Rahul Gandhi pic.twitter.com/hRiY1pzTji
— ANI (@ANI) October 27, 2018
‘राफेल प्रकरणावरून मोदींच्या हेतूविषयी जनतेला संशय नाही,’ असे शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांनी हे वक्तव्य करून जनतेच्या भावनांचा अनादर केला आहे, असे तारिक यांचे म्हणणे होते. शरद पवार यांचा मी आदर करतो. परंतु त्यांच्या या वक्तव्यामुळे मी दुखावला गेलो आहे. त्यामुळेच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे म्हणत तारिक अन्वर यांनी आपला राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसचाच एक भाग आहे, असेही अन्वर यांनी म्हटले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.