HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राष्ट्रवादीचा नवा गेम प्लॅन, माढ्यातून संजयमामा शिंदे यांना उमेदवारी ?

मुंबई | माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर आता रणजितसिंह आणि सुजय यांची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सध्या माढा मतदारसंघातून आमदार बबन शिंदे यांचे बंधू संजय शिंदे तर अहमदनगरमधून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अहमदनगरमधून राष्ट्रवादीकडून सुजय विखे पाटील यांच्याविरोधात आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये अहमदनगरमध्ये कडवी लढत पाहायला मिळणार आहे. संग्राम जगताप यांनी अहमदनगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आपल्याच पक्षातील वरिष्ठांना न जुमानता भाजप उमेदवाराला मदत केली होती.

संग्राम जगताप यांच्या या रणनीतीमुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षातील अन्य मोठ्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सर्व नगरसेवकांना नोटीस बजावली तसेच याबाबत १८ नगरसेवकांवर कारवाई देखील करण्यात आली. यावेळी संग्राम जगताप यांना अभय देण्यात आले होते.

Related posts

शोपियान येथील चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

सेना-भाजपचे नेते आमच्या संपर्कात | अशोक चव्हाण

Gauri Tilekar

कंटाळा झटका, कामाला लागा !

Gauri Tilekar