HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार ?

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेस लागलेली गळती थांबण्याचे नाव घेतना दिसत नाही. दररोज राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणताना कोणता नेता भाजप-शिवसेनेत प्रवेशाच्या बातम्या येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. फलटणमध्ये उदयनराजे आणि रणजित निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रणजित निंबाळकर हे भाजपचे माढ्यामधून खासदार आहेत.

उदयनराजे यांनी भाजप प्रवेशाबाबत सावध प्रतिक्रिया दिली. त्यांनी भाजप प्रवेशावर काहीच माहिती नसल्याचे सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा यांच्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळीच उदयनराजे यांच्या भेटीच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. प्रत्येक पक्षातील नेते माझे मित्र असून माझे वैयक्तिक संबंध आहेत. ज्या त्या वेळेस लोकांच्या हिताचा निर्णय मला घ्यावाच लागेल.

भाजपमध्ये जाण्याची वावटळ उठले असेल तर ते चांगलेच आहे. माझ्या मनाला जे पटते मी निर्णय घेत असतो कुणाच्या लादलेल्या निर्णयावर मी कधीच आजपर्यंत थांबलो नाही व थांबणार नाही, असे उदयनराजे म्हणाले. देवेंद्र फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून राज्याचा विकास झाला. यापूर्वी काय झाले हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे जिथे विकासकाम आहेत. जिथे जनतेच्या हिताचे कार्य आहे जर जनतेच्या हिताचे कार्य ज्या ठिकाणाहून होत असेल तर ते कधीही चांगले आहे यापूर्वीची काम झाली ती सगळी आडवा-आडवीची काम झाली कुठेही ठोस निर्णय कधीच झाले नाहीत. फडणवीस यांचा काळात विकासात्मक कार्य झाले, असे सांगत खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला आहे.

उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या यात्रेची खिल्ली उडवली

राष्ट्रवादीकडून काढण्यात येत असलेल्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होणार का? यावर आता सगळ्यांच्याच यात्रा येतील आणि आमची स्वतः ची जत्रा असताना मी कशाला त्या यात्रेत सहभागी होऊ असे म्हण शिवस्वराज यात्रेची खिल्ली देखील त्यांनी उडवली.

उदयनराजेंचे शिवेंद्रराजेंना चिमटे

शिवेंद्रराजे लाडके असून त्यांनी दाढी वाढवली आहे तर त्यांनी पिक्चर मध्ये काम केले तर सुपर हिट होईल असे म्हणत शिवेद्रराजेंना चिमटा काढला. शिवेंद्रराजे यांच्याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले, “शिवेंद्रराजे माझे धाकटे बंधू असल्याने मुलाची उपमा देत मुलांनी जर मांडीवर काय केले तर मांडी कापत नाहीत माझे लाडका आहे.” असे उदयनराजे म्हणाले. उदयनराजे यांनी एकंदरीतच भाजपच्या प्रवेशावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीत मी थांबणार असा कुठेही संकेत दिला नसल्याने राष्ट्रवादीला रामराम करत भाजप पक्षात जाण्यासाठी जनतेच्या मनात जे असेल जनतेच्या हिताचे असेल तेच करणार असे उदयनराजे म्हणाले. पुढे उदयनराजे असे देखील म्हणाले की त्यासाठी वेळप्रसंगी जे करायला लागेल ते करेल असे सांगत भाजप पक्षाच्या प्रवेशाला ग्रिन सिग्नलच उदयनराजेंची देहबोलींनी दिले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेता अक्षय कुमारला भाजपकडून तिकीट मिळणार ?

News Desk

बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून राज्यभरात नाराजी

Aprna

“आदित्य ठाकरेंचे शिवसेनेसाठी योगदान काय?,” रामदास कदमांचा सवाल

Aprna