HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

उदयनराजे भोसले आज ‘खासदारकी’चा देणार राजीनामा

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रवेश करण्याच्या चर्चेत असलेले साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आज (९ सप्टेंबर) त्यांच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली आहे. राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू आहेत. उदयनराजेंनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे म्हटले. आज ही महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामुळे उदयनराजे भाजपमध्ये  जाणार की राष्ट्रवादीतच राहणार याविषयीचा अंतिम निर्णय लवकरच होणार आहे.

उदयनराजे यांनी आज सकाळी ११ वाजता पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. मात्र, बैठकीच्या ठिकाणाबद्दल गोपनीयता बाळगण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीनंतर उदयनराजे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. ‘‘उदयनराजे कुठेही असतील तरी मी त्यांचे स्वागत करतो,’ अशी प्रतिक्रिया आता संभाजीराजेंनी दिली आहे.

 

 

Related posts

आता शिवसेनेचे खासदार विरोधी बाकांवर बसणार !

News Desk

भाजपने धनगर समाजाला सर्वाधिक न्याय दिला | चंद्रकांत पाटील

News Desk

सत्याचा कोंबडा आरवलाय ‘मौनीबाबा’ने दिलेला सल्ला गांभीर्याने घ्या !

News Desk