HW News Marathi
राजकारण

उदयनराजे भोसले आज ‘खासदारकी’चा देणार राजीनामा

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रवेश करण्याच्या चर्चेत असलेले साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आज (९ सप्टेंबर) त्यांच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली आहे. राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू आहेत. उदयनराजेंनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे म्हटले. आज ही महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामुळे उदयनराजे भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीतच राहणार याविषयीचा अंतिम निर्णय लवकरच होणार आहे.

उदयनराजे यांनी आज सकाळी ११ वाजता पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. मात्र, बैठकीच्या ठिकाणाबद्दल गोपनीयता बाळगण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीनंतर उदयनराजे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. ‘‘उदयनराजे कुठेही असतील तरी मी त्यांचे स्वागत करतो,’ अशी प्रतिक्रिया आता संभाजीराजेंनी दिली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रवीण छेडा, डॉ. भारती पवार पुन्हा भाजपमध्ये

News Desk

राफेल प्रकरणी मोदींना क्लिन चिट देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

News Desk

विरोधकांच्या ‘मारक शक्ती’मुळे भाजप नेत्यांचा मृत्यू !

News Desk