May 24, 2019
HW Marathi
राजकारण

नरभक्षक वााघाची शिकार करावी लागते, आयुक्तांना आनंद परांजपे यांचा टोला 

ठाणे |  वाघ- कुत्रे अशी विशेषणे वापरुन आयुक्तांनी केलेल्या भाषणाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. ठाण्याचा विकास हा ठाणेकरांच्या कररुपी पैशातून होत असतो. त्यामुळे स्वत:ला वाघ समजणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे की वाघ जंगलाची हद्द ओलांडून मानवी वस्तीत आला अन् नरभक्षक झाला की त्याची शिकार करावी लागते, अशा शब्दात आनंद परांजपे यांनी टोला हाणला. यावेळी भाजप आणि पालिका आयुक्त असा वाद रंगला.

महासभेची प्रश्नोत्तरे पालिका आयुक्तांच्या दालनात काही दिवसांपूर्वी घेतली असल्याने या सुनावणीची सीडी आपल्याला उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी सभागृहात केली होती. यावरून पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निवेदन करताना वैयक्तिक टीका न करण्याचे आवाहन करीत लोकप्रतिनिधीना या मुद्द्यावरून अनेक चिमटे काढले. एकदा कुत्रा चावला की प्रत्येक कुत्रा आपल्याला चावणार अशी भीती मनात बसते. त्यामुळे माझ्या मनात भीती निर्माण झाली असून नगरसेवकांना दिलेल्या सुनावणीचे चित्रिकरण केल्याचा उल्लेख आयुक्तांनी केला.

मात्र, शब्दशः अर्थ कुणी न घेतल्याने वादंग टळला. त्यानंतर वाघ जेव्हा आपली हद्द सोडत असतो तेव्हा त्यावर कब्जा करण्यासाठी अनेक जण सरसावत असतात. लवकरच माझी बदली होणार असल्याने तसे प्रयत्न तर होत नाहीत ना, असे टोकाचे उल्लेखही आयुक्तांनी केले. लोकप्रतिनिधीना दिलेल्या या चिमट्यांचा राष्ट्रावादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी चांगलंच समाचार मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये घेतला.

सभागृहात वाघ आणि कुत्रा असा उल्लेख करत लोकप्रतिनिधीना अप्रत्यक्षपणे  चिमटे काढणार्‍या पालिका आयुक्तांना राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. सभागृहात वाघ आपली हद्द सोडून गेला की,  त्या ठिकाणचा ताबा घेण्यासाठी अनेक जण सरसावतात असा उल्ल्लेख सभागृहात झाला असल्याचे मी ऐकले. मात्र वाघ जेव्हा हद्द सोडून शहरात येतो  तेव्हा तो नरभक्षक होतो, अशा वाघाची शिकार करावी लागते, असा उपरोधिक टोला परांजपे यांनी लगावला आहे . परांजपे यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहातील वादळ आता बाहेर देखील आले असून यानिमीत्ताने आरोप प्रत्यारोप अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत.

सभागृहात वाघ आपली हद्द सोडून गेला की, त्या ठिकाणचा ताबा घेण्यासाठी अनेक जण सरसावतात असा उल्ल्लेख सभागृहात झाला असल्याचे मी ऐकले. मात्र वाघ जेव्हा हद्द सोडून शहरात येतो  तेव्हा तो नरभक्षक होतो, अशा वाघाची शिकार करावी लागते असा उपरोधिक टोला परांजपे यांनी लगावला आहे . तर, विकासाची गाडी दोन बैल खेचत असतात. त्याच्या खाली एक कुत्रा असतो. पण, त्या कुत्र्याला वाटते की गाडी आपणच खेचत आहोत. अशीच अवस्था ठामपाच्या प्रशासनाची झाली आहे, असा टोला आनंद परांजपे यांनी लगावला.

Related posts

Saradha Scam : सीबीआयकडून पी.चिदंबरम यांच्या पत्नीविरोधात आरोपपत्र दाखल

News Desk

जयकुमार रावलच्या पदाचा राजीनाम्याची मागणी – नबाव मलिक

News Desk

पवारांच्या कुटुंबातील एकही उमेदवार लोकसभेत जाणार नाही !

News Desk