HW Marathi
राजकारण

जगासमोर देशाची प्रतिष्ठा जपण्यासाठी एअर स्ट्राईकचे पुरावे देणे आवश्यक !

मुंबई | “आम्ही फक्त आमच्यापुढे एक लक्ष्य ठेऊन ते लक्ष्य पूर्ण करतो. आम्ही केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले किती किंवा जिवीतहानी झाली ? हे मोजणे आमचे नाही तर सरकारचे काम आहे”, असे भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनुआ यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर “भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या कारवाईत खात्मा झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत धनोआ यांनी केलेले वक्तव्य हे सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आहे”, असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

“पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारताच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहिले. म्हणूनच भारतीय वायू दलाच्या कारवाईला देखील पाठिंबा मिळाला. मात्र, आता जर या कारवाईवरच प्रश्न उपस्थित होत असतील तर ते देशाच्या प्रतिष्ठेसाठी हानिकारक आहे. सरकार वायू दलाची प्रतिष्ठा राखण्यास अपयशी ठरले आहे”, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

त्याचप्रमाणे “आम्ही हल्ले करतो हेच दाखवायचा हा एक प्रयत्न असेल तर त्याची काहीच गरज नव्हती. कारण, यापूर्वीही ते दाखवून दिले आहे”, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. “वायुसेनेने आपले कर्तव्य चोख बजावले आहे. त्यामुळे आता जर आपल्याला संपूर्ण जगासमोर आपली प्रतिमा टिकवून ठेवायची असेल तर वायू दलाच्या कारवाईचे पुरावे जगासमोर ठेवणे आवश्यक आहे”, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी देखील एअर स्ट्राईकचे पुरावे, फोटोज देण्याची मागणी केली आहे.

Related posts

आयएनएस सुमित्रावर अक्षय कुमारला घेऊन जाणे बरोबर आहे का ?

News Desk

RamMandir : न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेत कायदा करा, उद्धव ठाकरेंचे मोदींना अल्टीमेटम

News Desk

जम्मू कश्मीरमध्ये भाजप पीडीपी युती संपुष्टात

News Desk