HW News Marathi
राजकारण

राहुल गांधी-चंद्रबाबू नायडू यांची भेट

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री तेलुगू देसम पार्टी(टीडीपी)चे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांची भेट. या दोघांच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू एनडीएमधून बाहेर पडले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर या दोघांमधील भेट झाली असल्याचे म्हटले जात आहे.

चंद्रबाबू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाच्या युतीची घोषणा केली. याआधी चंद्रबाबू नायडू यांनी एनडीएतून सुद्धा बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. भाजपविरोधात महाआघाडी निर्माण करण्यासाठी भेट घेतल्याचे म्हटले जाते आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार आणि पार्थ पवारांसंबंधी बारामतीतून आली मोठी बातमी

swarit

#MarathaReservation : सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारकडून कॅव्हेट दाखल

News Desk

#PulwamaAttack : देशात निर्माण झालेल्या एकतेला मतांमध्ये रूपांतरित करा !

News Desk