HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

आईशपथ मला डाऊट होता संज्याला मी चर्चगेट स्टेशनवर बघितलं होतं !

मुंबई | “आईशपथ मला डाऊट होता संज्याला मी चर्चगेट स्टेशन प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना फाटक्या कपड्यात बघितलं होतं. आज खात्री झाली”, असे म्हणत भाजप नेते नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना आणि अर्थात ठाकरे कुटुंब असा हा टोकाचा वाद संपूर्ण महाराष्ट्राला चांगलाच माहित आहे. त्यातही, निलेश राणे हे शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि अन्य शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांवर वारंवार अत्यंत जहरी टीका करत असतात. आपल्या ट्विटर हँडलवर निलेश राणे हे अत्यंत ऍक्टिव्ह असतात. आता निलेश राणेंनी शिवसेनेने मोठे नेते संजय राऊत यांना लक्ष केले आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरीच राहण्याचे आदेश आहेत. त्यामुळे, घरात राहून करायचे काय ? म्हणून प्रत्येकजण आपापल्यापरीने आपले मन रमवायचा प्रयत्न करत आहे. राजकीय नेत्यांची देखील हीच अवस्था आहे. त्यामुळेच, कधी राज्याचे गृहमंत्री पहिल्यांदा पहिल्यांदा स्वयंपाक करताना, तर कधी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा बुद्धिबळाचा डाव पाहायला मिळाला. प्रत्येकजण या दिवसांत आपला छंद जोपासून आपले मन रमवत आहे. संजय राऊत यांनी देखील आपला पेटी वाजवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ बघितल्यानंतर संजय राऊत यांच्या या कलेचे मोठे कौतुकही झाले. मात्र, निलेश राणेंनी त्यांची अत्यंत बोचऱ्या शब्दांत खिल्ली उडवली.

संपूर्ण देश हा सध्या होम क्वारंटाई आहे. देशासह राज्यभरातील नेतेमंडळी सध्या या ‘होम क्वारंटाईन’च्या काळात ज्या पद्धतीने आपले छंद जोपासत आहेत, आपला वेळ घालवत आहेत तो आता सर्वसामान्यांसाठी मोठ्या कुतूहलाचा विषय बनला आहे. आपल्या नेत्यांना अशाही रूपांत पाहायला मिळतंय, हे सर्वसामान्यांसाठी मोठे कुतूहलाचे आहे. सर्वसामान्यांनी देखील होम क्वारंटाईनचे दडपण न घेता मिळालेला हा एवढा मोठा वेळ छान सुखात घालवावा असा एक अप्रत्यक्ष संदेशही नेत्यांच्या किंवा बड्या कलाकारांच्या कृतीतून लोकांना मिळत आहे.

Related posts

पूरग्रस्तांना नवीन घरे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी, राज्य सरकारची घोषणा

News Desk

पूनम महाजन यांनी थेट ‘मातोश्री’ गाठले, युवासेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

News Desk

परदेशात २७६ भारतीयांना कोरोनाची बाधा, एकट्या इराणमध्ये २५५ भारतीय रुग्ण

अपर्णा गोतपागर