HW News Marathi
राजकारण

निर्मला गावित यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा दिला राजीनामा

मुंबई | काँग्रेसच्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वरच्या आमदार निर्मला गावित यांनी आज (२० ऑगस्ट) आमदारकीचा राजीनामा दिला आहे. गावित यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. निर्मला गावित या काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी खासदार माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. गावित यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

यामुळे उद्धव ठाकरेंनी गावित शिवसेनेत उद्या प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. गावित यांनी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे आज होणारा पक्ष प्रवेश रद्द करण्यात आला असून उद्या (२१ ऑगस्ट) प्रवेश करणार आहेत. गावित उद्या दुपारी १२ वाजता मातोश्रीमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आणखी मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ म्हणजे…”,वेदांता प्रकल्पावरुन पवारांचा शिंदे सरकारला टोला

Aprna

तुम्ही ‘त्यांच्या’ सगळ्या आचरट, बालिश चाळयांना पाठिशी घातले !

News Desk

आता १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत होण्याबाबत मोदी सरकारकडून नवी घोषणा ?

News Desk