HW News Marathi
राजकारण

निरुपम यांच्याविरोधात मुनगंटीवार अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार

चंद्रपूर | मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात मी चंद्रपूर जिल्ह्यात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. संजय निरुपम यांनी केलेले आरोप हे तथ्यहीन आणि अत्यंत खालच्या स्तराचे असल्याची टीका देखील मुनगंटीवार यांनी केली आहे. “राज्यात २०१५ पासून वाघांना ठार केल्याच्या घटना लक्षात घेता सुधीर मुनगंटीवार हे शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांच्या टोळीत सामील झाले असावेत”, असा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केले आहेत. या आरोपांवर आता मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय निरुपम यांनी आज त्यांच्या पत्रकार परिषदेत अवनी वाघिणीला ठार केल्याप्रकरणी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या संख्येत वाढ झाली असून या संपूर्ण प्रकारची सीबीआय चौकशी करण्याची मागणी संजय निरुपम यांनी केली आहे. मुनगंटीवार आंतरराष्ट्रीय शिकारी माफियासोबत मिळून पैसे कमवत आहेत, असा गंभीर आरोप निरुपम यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंचा ‘हा’ आक्षेपार्ह व्हिडीओ केला ट्वीट; “काय नाना…..तुम्ही पण…”

Aprna

युतीच्या सत्तास्थापनेबाबतचा निर्णय भाजपने लिखित स्वरूपात द्यावा !

News Desk

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna