राहुरी | राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अचानक चक्कर आली. यानंतर गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर माझी प्रकृती स्थिर असल्याची माहिती खुद्द नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. गडकरी यांनी म्हटले की, “रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने मला चक्कर आली असून मी माझ्या डॉक्टर तपासणी केली असून माझी तब्यात स्थिर आहे.”
Had slight medical condition due to low sugar. I have been attended by doctors and i am doing well now. I thank all of you for all the well wishes.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 7, 2018
राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना अचानक चक्कर आली, यावेळी मंचावर उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागहर राव यांनी त्यांना सावरले. डॉक्टरांनी तातडीने गडकरी यांची तपासणी केली. त्यानंतर गडकरी यांना रुग्णालयात हलवण्यात आले. गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर नितीन गडकरींचे आज(७ डिसेंबर)चे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसेच गडकरी यांना विशेष विमानाने नागपूर येथे नेण्यात येणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.