HW News Marathi
राजकारण

नितीन गडकरींना पुन्हा एकदा व्यासपीठावर आली भोवळ

शिर्डी | लोकसभा निवडणुकीतच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज (२६ एप्रिल) थंडवणार आहेत. शेवटच्या काही तास शिल्लक असताना अनेक राजकीय नेते मंडळीच्या प्रचाराचा थडाका लावला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. गडकरी शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना अचानक भोवळ आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती मिळाली आहे. नितीन गडकरी यांना मधुमेहाचा त्रास असून डॉक्टरांनी त्यांना यापूर्वीही विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

गडकरींना याआधीही अहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. कार्यक्रमात जवळपास अर्धा तास नितीन गडकरी यांनी भाषण केले होते. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. यावेळी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना भोवळ आली होती. नितीन गडकरी सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज संध्याकाळी एनडीएच्या नेत्यांची बैठक अन् डीनर पार्टी

News Desk

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे विधानभवनाबाहेर आंदोलन

News Desk

महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; होणार थेट प्रक्षेपण

Aprna