पाटणा | बिहारमध्ये सध्या घडत असलेल्या छोट्या मोठ्या घटनांनाही राजकीय दृष्ट्या महत्व प्राप्त होताना पहायला मिळत आहे. यावेळी चर्चेचा विषय आहे तो म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांना केलेला फोन. मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. सध्या लालूप्रसाद यादव मुंबईच्या फोर्टीज रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतु नितीश कुमार यांच्या या फोनवरुन राजकीय वर्तुळात मात्र भलतीच चर्चा रंगली आहे. बिहारच्या राजकीय परिस्थितीचा सध्या विचार केला तर सत्तेत असलेल्या जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात विषेश चांगले संबंध राहीलेले नाहीत. येत्या लोकसभा निवडणुकीच्या सीटांवरुन दोन्ही पक्षांचे बीनबनावर आल्याची चर्चा आहे.
नितीशकुमार यांच्या पक्षाने आधीच सांगितले आहे की बिहारमध्ये कोणतीही निवडणूक झाली तर चेहरा नितीश कुमार असतील. त्यामुळे भाजप नाराज असल्याचे बोललं जातयं. गेल्या काही दिवसांपासून नीतीश कुमार भाजपाच्या अनेक धोरणांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मत भिन्नता असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपचे नाव न घेता कालच नितीशकुमार म्हणाले होते मतदानासाठी सध्या चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे. जेणेकरून लोक जातीय आणि सांस्कृतिक कारणास्तव मतदान करतील अशी स्थिती निर्माण झाली असे. तसेच लोक कामकाजावर आधारित मतांची मागणी करत नाहीत असेही यावेळी नितीशकुमार म्हणाले होते.
Nothing but a late courtesy call to enquire abt his health as he underwent fistula operation on Sunday.Surprisingly NitishJi got to knw abt his ill health after 4months of hospitalisation.I hope he realises he is last politician to enquire following BJP/NDA Ministers visiting him https://t.co/lw7cNmXhDL
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) June 26, 2018
आरजेडी चे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले, नितीश कुमार यांच्यासाठी आरजेडीचे दरवाजे पुर्णपणे बंद झाले आहेत. इतकेच नव्हे तर आगामी काळात बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी आरजेडी कडून तेजस्वी यादव यांचाच चेहरा असेल असेही बोलले जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.