HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना कधीही मिळाली नसेल इतकी मदत युती सरकारने केली !

औरंगाबाद | “देशभक्तीने भारलेले सरकार पुन्हा निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. इतकेच नव्हे तर “महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना कधीही मिळाली नसेल इतकी मदत युती सरकारने केली आहे”, असा दावा देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला आहे. ते औरंगाबाद येथे आयोजित शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. “जसे शिवसेना भाजप फेविकाॅलचा मजबूत जोड झाला आहे. तसेच अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे होतील”, असा विश्वास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना कधीही मिळाली नसेल इतकी मदत युती सरकारने केली
  • जसे शिवसेना भाजप फेविकाॅलचा मजबूत जोड झाला आहे. तसेच अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे होतील
  • भाजप-शिवसेना एकमेकांना बोलले तरी मनाने आम्ही कधीच वेगळे झालो नाही.
  • आम्ही कधीही सत्तेसाठी एकत्र आलो नाही.
  • तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरीही आम्ही एकत्रच राहणार आहोत
  • जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाच्या सुविधा निर्माण होत आहेत
  • आगामी लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील ८ जागांवर युतीचेच उमेदवार निवडून येतील याबाबत शंका नाही

Related posts

छगन भुजबळ यांना आपले मतदान केंद्रच सापडेना

News Desk

अरविंद सुब्रमण्यन यांचा राजीनामा

News Desk

येडं पेरलं अन् खुळं उगवलं, धनंजय मुंडेंची दानवेंवर जहरी टीका

News Desk