HW Marathi
राजकारण

#NoMoreModi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंध्र प्रदेशातील सभेपुर्वी विरोधकांची पोस्टरबाजी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक राज्यांमध्ये जाऊन जनसभांना संबोधित करत आहेत. मोदींनी उत्तर-पूर्व भागांच्या दौऱ्यानंतर आता दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत. आज (१० फेब्रुवारी) आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक असा मोदींचा दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान महत्त्वाचे  म्हणजे एनडीएमधून तेलुगू देसम पार्टी बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा आंध्र प्रदेशचा हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे दक्षिणेतील राजकारण चांगलेच तापले आहे.

आंध्र प्रदेशातील शहरांमध्ये मोदींच्या विरोधात अनेक पोस्टर लावण्यात आली आहेत. काही पोर्स्टमध्ये  तर #NoMoreModi,   #ModiIsAMistake आणि #ModiNeverAgain असे लिहिण्यात आले आहे. तर दुसऱ्या पोस्टरवर आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबा नायडू यांनी मोदी आणि अन्य भाजप नेत्यांवर धनुष्य बाणाने निशाणा साधलेले चित्र दिसत आहेत. तसेच नायडूंनी कार्यकर्त्यांना जाहिररित्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा गांधीगिरी स्टाइलने विरोध करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे राज्यामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

 

Related posts

आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उदघाटन

News Desk

बांदेकरांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

News Desk

जैश-ए-मोहम्मदचा पुळका कोणाला आहे हे जगाला माहित आहे !

News Desk