नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री तेलुगू देसम पार्टी(टीडीपी)चे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांची भेट घेतली. अखेर काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्ष या दोन्ही पक्षांकडून एकत्र येण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे या पक्षांनी म्हटले आहे. प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत झालेल्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांमध्ये भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेसकडून महाआघाडीसाठी प्रयत्न सुरु आहेत. आता या महाआघाडीमध्ये तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडूचंद्रबाबू नायडू यांचा समावेश झाला आहे.
We had a very good meeting, the gist was that we have to defend democracy and future of the country. So we are coming together to work, all opposition forces must unite: Rahul Gandhi after meeting AP CM N Chandrababu Naidu pic.twitter.com/sqIBtMT87P
— ANI (@ANI) November 1, 2018
राहुल गांधी आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू एनडीएमधून बाहेर पडले होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या दोघांमधील भेट झाली असल्याचे अंदाज व्यक्त केला जात होताच. त्याचप्रमाणे या दोन्ही पक्षांनी आता ते एकत्र येत असल्याची घोषणा केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.