HW Marathi
राजकारण

आता मुंबईचे डबेवाले देखील अयोध्येला जाणार

मुंबई | अयोध्या राम मंदिराचा मुद्दा तापलेला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. याच मोहिमेसाठी आता मुंबई डबेवाला असोशिएशनचे प्रतिनिधी देखील त्यांच्या सोबत अयोध्येला जाणार आहेत. मुंबईहून मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्येला जाणार असून त्यांच्यासाठी विशेष रेल्वेची सोय केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. याच विशेष रेल्वेने मुंबईचे डबेवाले देखील अयोध्येला रवाना होणार आहेत.

यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या २५ नोव्हेंबरला आपण अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले होते.मुंबईच्या डबेवाल्यांच्या संकट काळात शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे यावली शिवसेना व उध्दव ठाकरे मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मुंबई डबेवाला असोशिएशनने म्हटले आहे. यासाठी मुंबई डबेवाले असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांचे नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ अयोध्येला जाणार आहे. दरम्यान, त्यांच्या डबे पोहोचविण्याच्या त्यांच्या सेवेत यामुळे कोणताही खंड नसून ही सेवा नियमित सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts

नाशिकच्या हिरे कुटुंबियांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

News Desk

डॉ. आंबेडकरांचा पुतळा संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात उभारणार !

News Desk

राज ठाकरे महाआघाडीसाठी हातकणंगले-सांगली मतदारसंघात घेणार सभा ?

News Desk