HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

आता न्यायालय देखील म्हणते ‘चौकीदार चोर है’ !

नवी दिल्ली | “आता सर्वोच्च न्यायालय देखील म्हणत आहे कि राफेल करारात घोटाळा झाला आहे. आता न्यायालयानेच सांगितले आहे कि चौकीदार चोर है. पंतप्रधान मोदींनी आता माझे खुल्या चर्चेचे आव्हान स्वीकारावे” असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणी पुन्हा सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

“आता न्यायालय देखील म्हणत आहे कि चौकीदार चोर है. त्यामुळे आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल प्रकरणी खुल्या चर्चेचे माझे आव्हान स्वीकारावे”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल करार प्रकरणी पुन्हा सुनावणी करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचप्रमाणे पुराव्याखातर दिलेल्या कागदपत्रांवर केंद्राने घेतलेले आक्षेप देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.

Related posts

#RamMandir : श्रीराम संपूर्ण विश्वाचे तर मग मंदिर केवळ अयोध्येतच का ?

News Desk

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले विठ्ठल-रखुमाईचे दर्शन

News Desk

#LokSabhaElections2019 : आज जाहीर होणार भाजपची पहिली उमेदवार यादी ? 

News Desk