HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरेंच्या विमानासमोर नीलगाय, थोडक्यात टळला अनर्थ

अयोध्या | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्या दौरा आटपून फैजाबाद विमानतळावून मुंबईच्या दिशेने रवाना होता थोडक्यात बचावले. उद्धव यांच्या धावपट्टीवर विमानाच्या उड्डाणावेळी अचानक समोर निलगाय आली. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमानाचा अपघात टळला.

दरम्यान राम मंदिराचे निर्माण होणारच, पण या सरकारने मंदिर बांधले नाही तर भविष्यात हे सरकार बनणार नाही, असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला दिला. अध्यादेशतील राममंदिरासाठी कायदा करा, पण राम मंदिर बांधा, असे आवाहनही त्यांनी केंद्रातील सरकारला केले. तसेच चार वर्षांपासून हे सरकार झोपले असून त्याला उठवण्यासाठी आम्ही आलो आहोत असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (२४ नोव्हेंबर) शरयू नदी काठावर सहकुटुंब आरती केली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती !

News Desk

४ आमदारांसह राधाकृष्ण विखे-पाटील लवकरच करणार काँग्रेसला रामराम ?

News Desk

महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी

Aprna