HW News Marathi
राजकारण

आता ‘त्यांना’ स्वतःला भाजपमध्ये जाण्याचा अनुभव घ्यायचा असेल !

पुणे | “भाजपमध्ये राहून घेतलेला माझा अनुभव मी उदयनराजे यांना सांगितला आहे. मात्र, आता त्यांना स्वतःला तो अनुभव घ्यायचा असेल. म्हणूनच ते भाजपमध्ये गेले असावेत”, असे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी (१४ सप्टेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी बोलत होते. ते पुण्यात बोलत होते.

“मी चार-पाच दिवसांपूर्वीच छत्रपती उदयनराजेंची भेट घेतली होती. आपण भाजपमध्ये जात असल्यास धोके तपासून पाहा, असे देखील मी उदयनराजेंना म्हटले होते. भाजपमध्ये राहून घेतलेला माझा अनुभव मी उदयनराजे यांना सांगितला होता. मात्र, आता त्यांना स्वतःला तो अनुभव घ्यायचा असेल. म्हणूनच ते भाजपमध्ये गेले असावेत”, असे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर साताऱ्यात राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे निश्चितच राज्यात भाजपची ताकद आणखी वाढली !

उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) रात्री उशिरा आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन शनिवारी (१४ सप्टेंबर) सकाळी दिल्लीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. “छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसते नाव जरी घेतले तरी सर्वांच्या मनात उर्जा निर्माण होते. त्याच शिवरायांच्या घराण्याचे नाव मोठे करणारे उदयनराजे यांनी राष्ट्रवादीमधून बाहेर पडत भाजपत प्रवेश केला. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे निश्चितच राज्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे”, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

INX Media Case : पी. चिंदबरम यांना ईडी अटक करू शकत नाही

News Desk

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलेय”, उद्धव ठाकरेंचा टोला

Aprna

वायनाडच्या लोकांनी एकदा अमेठीत येऊन पाहावे अन् सावध व्हावे !

News Desk