HW News Marathi
राजकारण

अधिकारी माझे ऐकत नाहीत, गिरीश महाजन यांची तक्रार

मुंबई | सरकार आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील वाद आता प्रकर्षांने पुढे येत आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी त्याबाबत जाहीर वक्तव्य केले आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल केल्यानंतर राज्यातील मंत्र्यांनी दुष्काळी भागाचे दौरे करण्यास सुरुवात केली आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा सध्या दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिसराला भेट दिली या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे विविध मागण्या केल्या आणि लवकरात लवकर हा दुष्काळाचा प्रश्न सोडवण्याची मागणी सुद्धा केली आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना, इथले अधिकारी माझं ऐकत नाहीत अशी थेट तक्रार केली आहे. अधिकाऱ्यांना फोन केला तर ते आचारसंहितेचे कारण सांगून टाळाटाळ करतात, असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे. गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यानंतर राज्य सरकार आणि प्रशासन यांच्यामध्ये चाललेला भोंगळ कारभार उघड झाला आणि या भोंगळ कारभाराचे परिणाम बळीराजाला भोगावे लागत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव नॉट रिचेबल; गुवाहाटीच्या दिशेने रवाना?

Aprna

राष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदींनी काय केले ?

News Desk

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला भव्य मोर्चा

Aprna