नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्षातील शेवटची ‘मन की बात’ या कार्यक्रमातून आज (३० डिसेंबर) देशवासियांशी संवाद साधला. आज मन की बात या ५१ व्या रेडिओ रेडिओच्या माध्यमातून संवाद साधताना मोदींनी मराठमोळ्या पुण्याची ‘सायकल कन्या’ वेदांगी कुलकर्णीचे कौतुक केले. वेदांगी १९ वर्षीय असून तिने सायकलवरून जगभ्रमंती करण्याचा संकल्प केला आहे. वेदांनीने आतापर्यंत २८ हजार किलोमीटर प्रवास केला आहे.
PM Modi during #MannkiBaat: Pune's 20-year-old Vedangi Kulkarni has become the fastest Asian woman to travel around the world on a cycle. For 159 days, she used to cycle 300km each day. Her passion for cycling is commendable. pic.twitter.com/Tnv9JDFwSW
— ANI (@ANI) December 30, 2018
या प्रवासात आतापर्यंत १५ देशांची भम्रंती केली आहे. वेदांगीने प्रवासाला सुरुवात करून १८० दिवस पूर्ण झाले आहेत. वेदांगी दिवसाला ३०० किलोमीटर प्रवास करते. जगभ्रमंती सायकलने करण्यासाठी २९ हजार किमी प्रवास पूर्ण आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियातून सायकल भ्रमंतीला वेदांगीने सुरुवात केली होती. तेथून वेदांगीने न्यूझीलंड, कॅनडा, ग्रीनलँड, स्पेन, फिनलँड, रशिया आणि भारत अशा चौदा देशांमध्ये सायकल प्रवास केला. चाकूहल्ला, पैसे लुटले जाऊनही वेदांगदीने जिद्द सोडली नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.