पुणे | पुणे तिथे काय ऊन हे म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही. पुणे शहर हे पुणेरी पाट्या यासाठी खास प्रसिद्ध आहे. आता पुणे भन्नाट प्लेक्सबाजीसाठी नागरिकांना पाहायला मिळते आहे. सध्या पुणे शहरात पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावरून पालकमंत्री गिरीश बापट व महापालिकेतील सत्ताधारी भाजपला या “गिरीश काय रे.?, दुष्काळ असताना सुध्दा अजितने कधी शहराला पाणी कमी पडू दिले नाही !, तु आपल्या शहरातला ना ?, पाणी कुठे पुरतय?, एक त्रस्त पुणेकर नागरिक, असा मजकुर असलेले बॅनरमधून टीका केली आहे.
याआधी पुण्यात शिवडे.. आय एम सॉरी.. तर कधी आपण यांना पाहिलत कां.? , ओ नगरसेवक भाऊ, तुम्हाला कुणीही रागावणार नाही, प्लिज, तुम्ही परत या… यांसारख्या मजकुरांच्या बॅनरने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसर दणाणून सोडला. या प्लेक्सबाजीतून कधी मनोरंजन केले तर कधी राजकीय वातावरणात रंग भरले.
शहराच्या पाणी वाटपावरून जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यात मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या वादातून आरोप-प्रत्यारो सुरू आहेत. त्यावरून शहरातील विविध भागात हे प्लेक्स लावण्यात आले आहेत. या लक्षवेधी प्लेक्सने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. परंतु ाबॅनवर गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.